------------------------------------------------------------------------------------------------------
सभासदांशी हितगुज
सन्माननीय मुख्याध्यापक, केंद्र समन्वयक, शिक्षक सभासद बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार !!!#MarkThe19June
#BeThePartOfHistoricalWin
#ThisTime4NaviMumbai
#Vote4AgreSir
#White_Ballot_Vote_Kite
स्वातंत्र्यपूर्व काळात 1929 मध्ये स्थापन झालेल्या ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी यंदा ९३ वर्ष पूर्ण होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या आर्थिक जडणघडणीत आपल्या पतपेढीचे मोठा वाटा आहे. यापूर्वी 2015 साली झालेल्या पतपेढी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ठाणे तालुक्यातून 2 उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यावेळेस आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेततून आपल्या संघटनेचे लोकप्रिय उमेदवार श्री. अविनाश जाधव सर आणि श्री आत्माराम आग्रे सर हे होते. त्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे मते पडली होती. ठाण्यातील दगडी शाळेत मतदान केंद्र असतानाही आपल्या नवी मुंबईतील तब्बल 300 च्यावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
अलीकडेच, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पतपेढीच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार *दिनांक 19 जून 2022 रोजी सदर निवडणूक पार पडणार आहे.* यावेळेस ठाणे तालुक्यातून एकच उमेदवार निवडून द्यावयाच्या असून त्यासाठी *आपल्या संघटनेमार्फत शिक्षकांमधील लाडके उदयन्मुख नेतृत्व श्री आत्माराम आग्रे सर हे उमेदवार आहेत.*
*ठाणे तालुका निवडणुका इतिहास व नवी मुंबई ची भूमिका*
पतपेढीचा ठाणे तालुका मतदार संघ हा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महापालिका तसेच पतपेढी कर्मचारी वर्ग यांचा एकत्रित मतदारसंघ आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये ठाणे महानगरपालिकेची सभासद संख्या ९००-१००० च्या वर असल्याकारणाने नेहमीच ठाणे महापालिकेतील उमेदवाराची सरशी ठरत आलेली आहे. परंतु असाही प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवी मुंबईतून श्री. रमेश तेली सर, श्री विवेक भोईर सर, श्री अय्याजुद्दीन शेख सर आदींनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये नवी मुंबई च्या वतीने संघर्ष चालू ठेवला आणि गतवेळी ही श्री. अविनाश जाधव सर आणि श्री आत्माराम आग्रे सर यांनी हा संघर्ष कायम ठेवला.
#MarkThe19June
#BeThePartOfHistoricalWin
#ThisTime4NaviMumbai
#Vote4AgreSir
#White_Ballot_Vote_Kite
*2022 च्या निवडणुकीत नवी मुंबई साठी ऐतिहासिक संधी*
आत्ताची 2022 ची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे कारण ठाणे तालुक्यातील मतदारांची आकडेवारी पाहता ठाणे महानगरपालिका 649, मीरा भाईंदर महानगरपालिका 132, कर्मचारी वर्ग 55 व नवी मुंबई मनपा 349 असे एकूण 1185 सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेतून दोन उमेदवार असून, आपण ढोबळ मानाने नवी मुंबई सोडून उरलेल्या 836 मतदारांपैकी किमान 800 मतदान झाले तर द्विभाजन होईल असे गृहीत धरल्यास ठाणे मनपातील उमेदवारास जास्तीत जास्त 400 ते 450 मतदान पर्यंत मजल जाऊ शकते. याचाच अर्थ आपल्या नवी मुंबईतील 100% म्हणजेच सर्वच सर्वच 349 सभासदांनी मतदानाचा अधिकार बजावल्यास आणि ठाणे व मीरा भाईंदर मधून किमान 75-100 मते मिळविल्यास (त्या अनुषंगाने आपल्या सर्वाना प्रयत्न करावयाचे आहेत) आपला उमेदवार 100% विजय होईल यात सुतरामही संशय बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे पतपेढीच्या 93 वर्षाच्या इतिहासात प्रथमच आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की या ऐतिहासिक विजयाचे केवळ साक्षीदार नव्हता भागीदार व्हा आजपासूनच सर्वांनी मनाशी पक्के ठरवा आता वेळ मुंबईची काहीही झाले तरी मी 19 जून ला माझा मतदानाचा हक्क बजावणाराच.
#MarkThe19June
#BeThePartOfHistoricalWin
#ThisTime4NaviMumbai
#Vote4AgreSir
#White_Ballot_Vote_Kite
