रविवार, १२ जून, २०२२

ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक निवडणूक २०२२-२०२७



   ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी

संचालक मंडळ निवडणूक २०२२-२०२७

------------------------------------------------------------------------------------------------------

सभासदांशी हितगुज 

सन्माननीय मुख्याध्यापक, केंद्र समन्वयक, शिक्षक सभासद बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार !!!

#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir

#White_Ballot_Vote_Kite


स्वातंत्र्यपूर्व काळात 1929 मध्ये स्थापन झालेल्या ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी यंदा ९३ वर्ष पूर्ण होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या आर्थिक जडणघडणीत आपल्या पतपेढीचे मोठा वाटा आहे. यापूर्वी 2015 साली झालेल्या पतपेढी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ठाणे तालुक्यातून 2 उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यावेळेस आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेततून आपल्या संघटनेचे लोकप्रिय उमेदवार श्री. अविनाश जाधव सर आणि श्री आत्माराम आग्रे सर हे होते. त्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे मते पडली होती. ठाण्यातील दगडी शाळेत मतदान केंद्र असतानाही आपल्या नवी मुंबईतील तब्बल 300 च्यावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

अलीकडेच, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पतपेढीच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार *दिनांक 19 जून 2022 रोजी सदर निवडणूक पार पडणार आहे.* यावेळेस ठाणे तालुक्यातून एकच उमेदवार निवडून द्यावयाच्या असून त्यासाठी *आपल्या संघटनेमार्फत शिक्षकांमधील लाडके उदयन्मुख नेतृत्व श्री आत्माराम आग्रे सर हे उमेदवार आहेत.*


*ठाणे तालुका निवडणुका इतिहास व नवी मुंबई ची भूमिका*


पतपेढीचा ठाणे तालुका मतदार संघ हा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महापालिका तसेच पतपेढी कर्मचारी वर्ग यांचा एकत्रित मतदारसंघ आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये ठाणे महानगरपालिकेची सभासद संख्या ९००-१००० च्या वर असल्याकारणाने नेहमीच ठाणे महापालिकेतील उमेदवाराची सरशी ठरत आलेली आहे. परंतु असाही प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवी मुंबईतून श्री. रमेश तेली सर, श्री विवेक भोईर सर, श्री अय्याजुद्दीन शेख सर आदींनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये नवी मुंबई च्या वतीने संघर्ष चालू ठेवला आणि गतवेळी ही श्री. अविनाश जाधव सर आणि श्री आत्माराम आग्रे सर यांनी हा संघर्ष कायम ठेवला.


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir

#White_Ballot_Vote_Kite


*2022 च्या निवडणुकीत नवी मुंबई साठी ऐतिहासिक संधी*


आत्ताची 2022 ची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे कारण ठाणे तालुक्यातील मतदारांची आकडेवारी पाहता ठाणे महानगरपालिका 649, मीरा भाईंदर महानगरपालिका 132, कर्मचारी वर्ग 55 व नवी मुंबई मनपा 349 असे एकूण 1185 सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेतून दोन उमेदवार असून, आपण ढोबळ मानाने नवी मुंबई सोडून उरलेल्या 836 मतदारांपैकी किमान 800 मतदान झाले तर द्विभाजन होईल असे गृहीत धरल्यास ठाणे मनपातील उमेदवारास जास्तीत जास्त 400 ते 450 मतदान पर्यंत मजल जाऊ शकते. याचाच अर्थ आपल्या नवी मुंबईतील 100% म्हणजेच सर्वच सर्वच 349 सभासदांनी मतदानाचा अधिकार बजावल्यास आणि ठाणे व मीरा भाईंदर मधून किमान 75-100 मते मिळविल्यास (त्या अनुषंगाने आपल्या सर्वाना प्रयत्न करावयाचे आहेत) आपला उमेदवार 100% विजय होईल यात सुतरामही संशय बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे पतपेढीच्या 93 वर्षाच्या इतिहासात प्रथमच आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की या ऐतिहासिक विजयाचे केवळ साक्षीदार नव्हता भागीदार व्हा आजपासूनच सर्वांनी मनाशी पक्के ठरवा आता वेळ मुंबईची काहीही झाले तरी मी 19 जून ला माझा मतदानाचा हक्क  बजावणाराच.


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir

#White_Ballot_Vote_Kite


*आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची*


एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल की आपण शंभर टक्के मतदान वर म्हणजेच 350 मतांवर न थांबता आपल्या सर्वांनी ठरवले तर ठाणे व मीरा भाईंदर पट्ट्यातील आपले सहकारी नातेवाईक असलेल्या शिक्षकांनाही आपल्या उमेदवारीसाठी मतदान करण्यासाठी प्रयत्न केले तर आपले मताधिक्य नक्कीच वाढेल. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण फक्त मतदाते न होता प्रचारक सुद्धा व्हा… आपल्या नवी मुंबईची 349 मतदाते शिक्षक आणि उर्वरित शिक्षक असे मिळून जवळपास 600 प्रचारक…. आणि आपले सन्मा. निवृत्त शिक्षक… सर्वानीच ठरवले तर… हो हे घडून येईल… फक्त आणि फक्त नवी मुंबईसाठी… न भुतो!!! भविष्यतो!!! चला मग इतिहास घडवूया…


(टीप : आम्ही सोबत ठाणे तालुक्यातील सर्व मतदारांची महानगरपालिका निहाय यादी जोडत आहे. या यादीचा आपल्याया प्रचारासाठी उपयोग करावयाचा आहे.)


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir

#White_Ballot_Vote_Kite


*मतदान केंद्र विषयी*


2015 च्या निवडणुकीमध्ये ठाणे तालुक्यासाठी ठाण्यामधील दगडी शाळा हे मतदान केंद्र होते. नवी मुंबईकर शिक्षकांसाठी अडचणीचे केंद्र असूनही त्यावेळेस बहुसंख्य मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. आपल्यातील अनेक शिक्षकांनी स्वखर्चाने स्वतःची वाहने मतदारांच्या वाहतुकीसाठी वापरली. जमेल त्या पद्धतीने आपल्या शिक्षकांनी दगडी शाळेत पोचून आपल्या नवी मुंबईतील उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आपल्या सर्वांचा उत्साह नक्कीच वाखाणण्याजोगा होता.

नवी मुंबईकर शिक्षकांसाठी मतदान केंद्र नवी मुंबईतच असावे, यासाठी 2015 मध्ये ठाण्यातून निवडून आलेले संचालक श्री. बाबाजी फापाळे सर व आपल्या संघटनेचे श्री. आत्माराम आग्रे सर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून यावेळेस नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घणसोली येथे आहे. त्यामुळे बहुसंख्य शिक्षक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावणे सुकर झालेले आहे. आपल्यासाठी हा शुभ शकूनच म्हणावा. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे 100% मतदान करण्याची आणि आपला विजय पताका पतपेढीवर रोवण्याची…


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir

#White_Ballot_Vote_Kite


*आपल्या उमेदवाराविषयी*


आपले उमेदवार श्री. आत्माराम पांडुरंग आग्रे यांच्याबद्दल नवी मुंबईतील शिक्षकांना वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. गेल्या 18-19 वर्षात त्यांनी नवी मुंबईतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान केले आहे, याचे आपण सर्व साक्षीदार आहात. संघटना कोणतीही असो, नवी मुंबई येथील शिक्षकांची सेवा करणे एकाच व्रताने झपाटलेले नेतृत्व म्हणजे श्री. आत्माराम आग्रे सर…  श्री. सागरनाथ भंडारी सर, श्री. संजय मोरे सर आणि श्री. खुशाल चौधरी सर यांच्यासह आपल्या संघटनेच्या शिर्ष नेतृत्वाने त्यांना उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले... आपल्या शिक्षकांप्रती व संघटनेप्रती एकनिष्ठता, शिक्षकांच्या कामाला व सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य यामुळे गतवेळी श्री. अविनाश जाधव सर व श्री आत्माराम आग्रे सर हे नवी मुंबई कडून एक मताने ठरलेले उमेदवार होते आणि आताही श्री. आत्माराम आग्रे सर यांनी भरलेल्या उमेदवाराने अर्जासाठी सूचक त्यांचे परममित्र श्री. बबन दरेकर सर तर अनुमोदक नवी मुंबई कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, ज्येष्ठ मुख्याध्यापक सन्मा. श्री. व्यंकटेश कांबळे सर हे आहेत. तसेच गेल्या वेळेप्रमाणे सुद्धा नवी मुंबईतील सर्व शिक्षक संघटना, शाळा मुख्याध्यापक, आणि शिक्षक सहकाऱ्यांनीही यावेळेसही आपली पूर्ण शक्ती एक मुखाने आणि एक दिलाने स्वच्छ चारित्र्याचा मेहनती श्री आत्माराम आग्रे सर यांच्या मागे उभी केली आहे. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो.


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir


*पतपेढी निवडणुकीसाठी चे घोषणापत्र/ वचन नामा*


पतपेढी साठी आपले वचन नामा पत्र आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि मताने अंतिम करण्याची आमची योजना आहे. यासाठी आपणास आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आपला वचननामा तयार करणेत येत आहे.


  1. नवी मुंबई साठी स्वतंत्र मतदार मतदारसंघ (सूचक - श्री. संजय मोरे सर)
  2. शिक्षकांना ठेवलेल्या मुदत ठेवींवर कर्ज उचलण्याचे सुविधा (सूचक - श्री. संतोष मुंढे सर)
  3. पतपेढीने घेतलेले कर्ज आयकर कपातीसाठी ग्राह्य धरणे. (सूचक - श्री. रविंद्र म्हात्रे सर)
  4. नवीन कर्ज देताना यापूर्वी कपात करणेत आलेली विमा रक्कम पुन्हा कपात न करणे. (सूचक - श्री. बबन दरेकर सर)
  5. पतपेढीचा Digital App द्वारे सभासदांना त्यांच्या जमा रक्कमेची व कर्ज रक्कमेची अद्यायावत माहिती उपलब्ध करुन देणे. (सूचक - श्री. आत्माराम आग्रे सर)
  6. पतपेढीचा लाभांश सातत्याने 12% पेक्षा जास्त देणे. (सूचक - श्री. सुनिल बोरसे सर)


#MarkThe19June 

#BeThePartOfHistoricalWin 

#ThisTime4NaviMumbai

#Vote4AgreSir


आता वेळ दवडू नका. चला आपण सर्व एकच पण करूया. ठाणे पतपेढीवर आग्रे सरांना विजयी करुन स्वर्णमयी इतिहासाचे भागीदार होऊया.


- नवी मुंबईचा एकमुखी पाठींबा -


  • माजी व आजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील अण्णा प्रणित)., नवी मुंबई शाखा.
  • माजी व आजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिक्षक नेते संभाजीराव थोरात प्रणित). नवी मुंबई शाखा.
  • अध्यक्ष, नवी मुंबई कास्ट्राईब शिक्षक संघटना.
  • सर्व माजी उमेदवार, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढी.
  • सर्व केंद्रप्रमुख, नवी मुंबई महानगरपालिका
  • सर्व मुख्याध्यापक, नवी मुंबई महानगरपालिका
  • सर्व प्राथमिक शिक्षक, नवी मुंबई महानगरपालिका
  • सर्व निवृत्त प्राथमिक शिक्षक, नवी मुंबई महानगरपालिका


धन्यवाद !!!

 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निशाणी : पतंग

 
 ------------------------------------------------------------------------------------------------------------                      टीप : १. प्रत्येक मतदारांस एकूण ५ मतपत्रिका मिळणार असून त्यातील पांढ-या रंगाची मतपत्रिका हि ठाणे तालुक्यातील १ संचालकपदाच्या निवडीसाठी असून आपणांस या मतपत्रिकेवर १ मते द्यावयाची आहेत. तरी आपण या मतपत्रिकेतील श्री. आग्रे सर यांच्या नावासमोरील पतंग या चिन्हावर बाणफुलीचा शिक्का मारावयाचा आहे.अनु क्र. १ - श्री. आग्रे आत्माराम पांडुरंग   - निशाणी पतंग 



२. या मतपत्रिकेवर एक पेक्षा जास्त उमेदवारांना मतदान केल्यास (एकपेक्षा जास्त निशान्यांवर शिक्का मारल्यास) आपले मतदान बाद होईल याची कृपया नोंद घ्यावी. 
३. मतदानाची दि. आणि वेळ : रविवार १९/०६/२०२२ रोजी स. ९.०० ते सायं. ५.००४. मतदानाचे स्थळ : न.मुं.म.पा. शाळा क्र. ४२, घणसोली.            
                                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा